Vishal Borkar (Journalist)
View Point News
जिवती
-चंद्रपूर जिल्हातील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने बांधकामे खोलबली आहेत. जिल्हात एकाही रेती घाटाचा अधिकृत रित्या लिलाव झालेला नाही. यामुळे सरकारी बांधकामासाठी रेती कुटून येते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिवती तालुक्यातील सध्या महसूल विभागाची एक चमू चारचाकी वाहनाने रात्रीच्या वेळेस घिरक्या घालत फिरत आहे. ही चमू रेती तस्कराकडून अवैध वसुली करीत असल्याची चर्चा घरकुल लाभार्थी कडून केली जात आहे.
जिवती तालुक्यातील अडीच हजाराच्या वर घरकुलची कामे रखडली आहेत.दुसरीकडे जलजीवन मिशन या शासनाच्य महत्वकाशी योजनेची कामे सुद्धा रेती अभावी अपूर्ण आहेत. शासनाने जलजीवन मिशनची कामे मंजूर केली. मात्र रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने ही कामे रखडली आहेत. तसेच घरकुल पूर्ण करा असे वारंवार लाभार्थी ला सूचना दिल्या जात आहेत.मात्र बांधकामत महत्वाचा घटक असलेली रेतीच मिळत नसल्याने कामना ब्रेक लागला आहे. तर दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाने कामना विलंब होत असल्याने ठेकेदारणा प्रतिदिन पाचशे ते एक हजार रुपये दंड ठोतावण्यास सपाटा लावला आहे.
जिवती तालुका हा तेलगाणा राज्याला लागून असल्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात छूप्या मार्गाने रेतीची तस्करी होत असताना दिसत आहे. व चड्या भावाने घरकुल धारकांला ते विकत घेणे घरजेचे पडत आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या बजेट मध्ये घर पूर्ण कसे होईल हा मोठा प्रश्न घरकुल लाभार्थीला पडला आहे.
