Vishal Borkar (Journalist)
दै. अधिकारनामा & View Point News
चंद्रपुर:-
प्रत्येक गावागावात वाडी, वस्तीत नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळावे,हर घर जल,असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मां.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली मात्र कोट्यवधी रुपयांच्या कामात दिरंगाई होत असुन नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असुन पाणीपुरवठा अधिकारी व कंत्राटदार यांच्या मिलीभगतीमुळे वस्तीतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.सदर कामाची मर्यादा शासनाने १५ महिन्या पर्यंत ठेवली आहे मात्र दोन ते अडीच वर्ष निघून गेले परंतु जलजीवन मिशनचे काम प्रगतीपथावर पाहचलेच नाही हे केवळ पाणी पुरवठा अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कुंभकर्णाच्या निद्रेत असलेल्या कंत्राटदारावर मात्र कोणतेच परीणाम होत नसल्याची ओरड जनतेमधून होत आहे तालुक्यातील ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम सूरू आहे तसेच काम अपुर्ण व पुर्ण झालेल्या जलजीवन मिशनच्या कामाबद्दल पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून जाणून घेणे अपेक्षित आहे मात्र अधिकारी व कर्मचारी संबंधित कामाकडे फीरकुन सुध्दा पाहत नाही ही एक शोकांकिता आहे.जलजीवन मिशनच्या कामात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांनी मीलीभगत करून अंदाजपत्रकानुसार कामे न करता अंदाज पत्रकाला तिलांजली देत नित्कृष्ट दर्जाची कामे करीत अनेक कामावर मोजमाप पुस्तिकेत जास्त कामे दाखवून जास्त रक्कम कंत्राटदारांना अदा करण्यात आल्याचे कारनामे उघडकीस आले आहेत.या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना हर,घर,जल, व मुबलक स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र कामाच्या संत गतीमुळे नागरिकांना पीन्याच्या पाण्याची आशा असुन नागभीड,सिदेंवाही,मुल,वरोरा,चिमुर व इतर गावातील वस्तीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देन्याची गरज आहे असे जनसामान्य नागरीकामधुन बोलल्या जात आहे.
