Vaishnavi Kamdi (Journalist)
VIEW Point News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीला मोठ्या बहुमताने विजय मिळालं आहे. ५ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता नव्या सरकारची शपथविधी होणार असून महायुती सरकारची पहिलीच हिवाळी अधिवेशन आहे. महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २०२४ चा विधानसभा अधिवेशन नागपूरला १६ ते २१ डिसेंबरला होणार आहे. यावेळेस अधिवेशन कमी दिवसाचे होणार आहे. कारण यावेळेस प्रश्न उत्तरांची कालावधी नाही आहे कारण यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे. यावेळेस आमदारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले. ते बदल म्हणजे डिजिटल आसन व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा सभागृहात आमदारांच्या आसनासमोर सभागृहाच्या दैनंदिन कामकाजासह इतर माहिती देणारी डिजीटल स्क्रीन बसवण्यात येत आहे. या डिजीटल स्क्रीनमुळे आमदारांना सभागृहाच्या कामात सहभागी होताना सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येणार आहे. विधानपरिषदच्या आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे. या अधिवेशनात लाडक्या बहिणीच्या वाढीव रकमेवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या १० दिवसात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचे नजरा लागल्या आहे.
