Vaishnavi Kamdi (Journalist)
View Point News
नव्या सरकारची शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. महायुतीने निवडणुकीदरम्यान नागरिकांना मोठे अश्वशन दिले होते मात्र आता हे आश्वासन पूर्ण होणार का? हे बघणं महत्वाचं ठरलं आहे. दरम्यान नव्या सरकारची सत्ता स्थापन होण्या आधी मोठी बातमी समोर येत आहे. नव्या सरकारच्या काळात सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढ करणायचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
राज्यात नव्या सरकारची शपथविधी ५ डिसेंबरला ५ वाजता होणार आहे. शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. महायुतीने निवडणुकांच्या प्रचार दरम्यान नागरिकांना अनेक मोठी- मोठी आश्वासन देण्यात आली होती मात्र आता ही आश्वासन पूर्ण होणार का? या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. मात्र नव्या सरकारच्या काळात सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
एसटी महामंडळाचा प्रस्ताव नेमका काय ?
एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे भाडेवाढ करणायचा प्रस्ताव सादर केला आहे. तब्बल १८ टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्के तिकिटाच्या दरात भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, वाढता इंधन दर,सुट्ट्या भागांची वाढती किंमत, टायर आणि लुब्रिकंट यांचे वाढते दर या कारणामुढे भाडेवाढ करण्याची गरज एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे. जरी एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला असला तरी राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सरकार अद्याप स्थापन झालेली नाही आणि त्यामुळे सरकार स्थापन होताच या प्रस्तावाबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीपुर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.
एसटीला प्रतिदिन 15 कोटींचा तोटा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिदिन १५ कोटींच्या आसपास एसटी महामंडळाचा तोटा होत आहे. हा तोटा कमी नसून मोठा आहे. इतका मोठा तोटा प्रतिदिन होत असल्याने ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं, म्हटलं जातंय. याआधी एसटी महामंडळाने २०२१ मध्ये भाडेवाढ केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही.
