Vishal Borkar (Journalist)
View Point News
शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय,व प्राधान्य कुटुंबांतील शिधापत्रिका धारकांना अन्न धान्याचा लाभ दिला जातो.राशन कार्डमध्ये नोंदनी केलेल्या सर्व सदस्यांनी येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत ईकेवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शिधापत्रिका धारकांना येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत ईकेवायसी करन्याचे आव्हान केले आहे.सर्व पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या रास्त भाव दुकानदाराशी संपर्क करून तात्काळ आपली ईकेवायसी पुर्ण करून ई पास मशीनवर बोटाचे थंब प्रमाणीकरण करून ताबडतोब ईकेवायसी करून घेणे संबंधित शिधापत्रिका लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ईकेवायसी पुर्ण न केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मिळणाऱ्या अन्न धान्याचा लाभ बंद होईल तसेच ईकेवायसी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानात सक्षम उपस्थित राहुन ईकेवायसी पुर्ण करून घेणे अनिवार्य आहे सोबतच ईकेवायसीसाठी लागणारी कागदपत्रे कुटुंबांतील सर्व पात्र लाभार्थ्यांचे मुळ आधार कार्ड / झेरॉक्स प्रती.व रेशनकार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. असे तहसील कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे दिलेल्या मुदतीत ईकेवायसी पुर्ण न केल्याने अन्न धान्याचा लाभ बंद झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असणार आहे याची खबरदारी शिधापत्रिका लाभार्थ्यांनी घेन्यात यावी असे आव्हाहन करण्यात येत आहे.
