Vishal Borkar (Journalist)
View Point News
अहेरी तालुक्याच्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (३५३ सी) आलापल्लीपासून १५ किमी अंतरावर नंदीगाव ते गुड्डीगुडम या गावाच्या मधात महामार्ग एक वर्षांपूर्वी खोदून फक्त गिट्टी पसरविण्यात आली. वाहनांच्या वर्दळीमुळे सदर गिट्टी पूर्ण पसरली आहे. परिणामी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.गिट्टीमुळे सदर मार्गावर दुचाकी वाहनधारकांना एक किमी रस्ता आपला जीव मुठीत घेऊन पार करावा लागतो, तसेच मोठे वाहन आले तर धुळीत रस्ताच दिसत नाही. इतकी मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.अनेकदा दुचाकी वाहनचालक दुचाकी स्लिप होऊन कोसळून जखमी झाले आहेत. वेळप्रसंगी भविष्यात सदर ठिकाणी मोठा अपघात घडल्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार राहील काय? असा, प्रश्न नागरिकांकडून निर्माण होत आहे.नंदिगाव ते गुड्डीगुडमजवळील मार्गचे काम सुरू न करताच संबंधित कंत्राटदार मार्ग खोदून गिट्टी पसरविल्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेत या ठिकाणी मार्ग त्वरित तयार करावा किंवा गिट्टी बाजूला करावी. जेणेकरून रहदारीस अडचण निर्माण होणार नाही.
