विशाल बोरकर
View Point News
नागभीड:-
तालुक्यातील वाहतुकीचे रस्ते सोडा पण साधे पांदण रस्ते ही सरकारला नीट करता आले नाही नागभीड तालुक्यातील पांदण रस्त्याची समस्या अद्याप सुटली नसून येतील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे शेतात विविध कृषी कामासाठी जाताना व शेतातून शेतमाल आणताना त्यांना तारेवरची कसरत करावा लागत आहे तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ अजूनही मूलभूत सुविधा साठी तळमडळतांना दिसत आहेत अहेरी तालुक्यातील गोविंदपूर, खरबी , सोनापुर यनोली( माल)भागात पादन रस्ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत मात्र याचं रस्त्याची पावसामुळे वाट लागली आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी त्रास होत आहे शेतातील धान्य माल आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे या पादन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे अतिपावसामुळे नागभीड तालुक्यातील इतर परिसरातील पांदन रस्त्याची अवस्था अतिशय बिघड झाल्याने शेतातील धान्य तसेच शेतीच्या मशागसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पांदण रस्ते मातीचे असल्याने त्यात पाण्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले आहेत यातुन बैलांना चालताना प्रचंड त्रास होत आहे शिवाय मंजूर व शेतकऱ्यांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे बहुतांशपादन रस्ते चिखलमय झाल्याने विविध समस्या तोंड द्यावे लागत आहे एक तर मजूर डोक्यावर अवजोर आनु शकत नाही तर दुसरीकडे बैलबंडी ट्रॅक्टर शेतात नेताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो अशातच रस्त्यावरील चिखलात कधी बैलबंडी फसेल हे सांगता येत नाही वाही वाट अरुंद होत चालली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आपसात वांदाचे प्रसंग उद्धवतअसून यावर तोडगा काढण्याची गरज आहे शासनाचा नियमाप्रमाणे रस्त्याची मोजणी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास कधी कमी होणार व पांदण रस्त्याचा प्रश्न कधी सुटेल असा सवाल उपस्थित केला जात आहे नाल्याकडे जाणारा पांदण रस्ता ते नाल्याकडे जाणारा पादन रस्ता असे अनेक रस्ते दुर्लक्षित व दुरवस्थेत आहेत
