Vishal Borkar (Journalist)
View Point News
चिमूर:-
चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरित्रातील गोंडमोहाळी परीसरातील चिमूर सिंदेवाही रस्त्यावर चक्क अस्वल आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पहाटे पळसगाव पिपर्डा, गोंडमोहाळी या गावातील लहान मुले,मुली तरुण, नेहमी या रस्ताने व्यायाम करायला जात असतात. आज भल्या पहाटे अस्वल दिसल्याने व्यायाम करायला जाणारे मुले, तरुण भयभीत झाले आहेत.
परिसरातील नागरिक तसेच सकाळच्या सञात शाळेत जाणारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने यावर पाळत ठेऊन लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शेतकऱ्याचा शेतातील खरीप माल कटाई झाल्याने शेती मध्ये शेतकऱ्याचे जागल करणे बंद आहेत. शेतात असलेल्या बोरीच्या झाडावर बोरी खाण्यासाठी अस्वल गावा शेजारी येत आहे.ताडोबाचे जंगल लागून असल्याने नेहमी वन्यप्राणी गावा शेजारी येत असतात.या परिसरातील नागरिक दिवसा कामासाठी बाहेर निघण्यास घाबरत आहेत.
