Vishal Borkar (Journalist)
View Point News
नागभीड:-
तालुक्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाला सुरूवात होत असल्याने शेकडो एकर शेतातील उभ्या तुर पिकावर अळीचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत चालल्याने शेतकरी हा पुन्हा एकदा संकटात सापडला असुन शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याने कृषी केन्द्र चालकांकडून सांगेल त्या महागाईच्या औषधे घेउन फवारणी करीत असुनही कोणत्याही प्रकारचा परिणाम शेतपिकावर दिसुन येत नाही आहे तालुक्यात सततच ढगाळी वातावरण तयार होत असल्याने फवारणी केलेल्या पिकावर लाभदायक परीणाम दिसत नाही आहे शेतकऱ्यांचे कापुस, सोयाबीन विकुन आलेली रक्कम शेतमालावर व तुर पिकावर झालेल्या अळीच्या प्रादुर्भावावर महागळया औषधावर खर्च होत असल्याने जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळिराजा पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला आहे तालुक्यातील ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांतून विहीर पुनर्भरण व खोलीकरणसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करन्यात आला आहे परंतु पाणी पातळी खोलवर असल्याने शेतकऱ्यांना ओलिताची पिके घेणे देखील अवघड झाले आहे पाणी देउन तुरीची पिके तरी व्यवस्थित घ्यावे यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतांना धोके वाढल्याने शेकडो एकरवरील शेतात उभ्या तुर पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे महागाईच्या औषधे घेउन शेतकरी फवारणी करतांना दिसत आहे केलेल्या फवारणीमुळेहि अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने यंदा तुरीची पिके सरासरीपेक्षा कमी उत्पन्न देण्याचा अंदाज आहे तालुक्यात तीन ते चार हजार हेक्टरवर पेरन्या झालेल्या तुरीची पिके धोक्यात आली आहे कापूस सोयाबीन विकुन आलेला पैसा यावर फवारणीसाठी खर्च होत असल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थचक्र बिघडत चालले आहे वर्षभरात पाई पाई जमा करून ठेवलेली जमापुंजी या कामी खर्च होत असल्याने शेतकरी पुर्णपने कंगाल होन्याची शक्यता आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाप्रमाने त्वरित कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
