Vishal Borkar (Journalist)
जपान मध्ये युद्धाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकताच मरण पावलेल्या भावला पाठिशी बंधुन पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला निट दफण करावं या भावनेन तो दुरवर चालत आला होता . त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला , प्राण गेलेल्या भावाला पाठिवर घेऊन ऐवढ्या लांब चालत आहेस, ते आझे खाली टाकून दे, म्हणजे तुला हलके वाटेल, त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला कि, हे आझे नाहिये सर, हा माझा भाऊ आहे. हे ऐकूण त्या सैनिकाच्या डोळ्यात पाणि तरळले, तेव्हा पासून हा फोटो जपानमध्ये ” सिम्बॉल ऑफ युनिटी ” म्हणून प्रसिद्ध झाल. “हे आझे नाहीये सर, हा माझा भाऊ आहे.” हा बोध किती सुंदर आहे. आपले ( लहान/ मोठे) भाऊ , बहिण आपल्यावर आहे नाहीत , आयुष्याच्या वाटेवर चालतांना ते पडले तर, त्यांना उचला, दमले तर आधार घ्या, ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा, मोठ्या मनाने माफ करा, जर अख्या जगाने जर त्यांना दूर लोटले, तर त्यांना तुम्ही पाठिवर घ्या, कारण ते ओझे नाहिये, तर ते तुमचे स्वतःचे भाऊ बहिन आहेत.
