Vaishnavi Kamdi (Journalist)
View Point News
दिल्लीहुन मोठी बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर दरम्यान हल्ला करण्यात आला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा सुरु असताना हा हल्ला करण्यात आला. दिल्लीची विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांची प्रचारसभा सुरु आहे. आज त्यांची पदयात्रा सुरु असतांना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला.
अरविंद केजरीवाल हे विधानसभा निवडणुकीसाठी आपला प्रचार करत आहे. आज त्याची पदयात्रा ग्रेटर कैलाश परिसरात आयोजित करण्यात आली. यादरम्यान त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद केजरीवाल यांनी कोणतीही जीवितहानी झाली नाही. हल्लेखोरांना त्यांच्या सुरक्षा रक्षाकांकडून तुरंत ताब्यात घेण्यात आले आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर कुठलातरी तरल पदार्थ फेकत हल्ला केला. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचं ‘आप’ ने म्हटलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वरतीवली जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ कडून जोरदार तयारी केली जात आहे. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या पदयात्रा सुरू आहेत. आज त्यांची पदयात्रा ही ग्रेटर कैलाश भागात होती. पदयात्रा सुरू असताना एक अज्ञात व्यक्ती समोरून आला आणि त्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर कुठला तरी तरल पदार्थ फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपचा हात असल्याचा आरोप ‘आप’ कडून करण्यात आला आहे. आता या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
