Vishal Borkar (Journalist)
दै.अधिकारनामा & View Point News
पुणे : राज्यातील पाऊस वाढतच असून 8 ते 13 जून या सहा दिवसांच्या कालावधित बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान 10 जून पासून मान्सूनचा मुक्काम मुंबई,पुण्यातून संपवून तो राज्यातील इतर भागात जाईल असा अंदाज आहे. हवामान विभागाने 9 जून पर्यंत राज्यीतल बहुतांश भागाला यलो अलर्ट देत पुढे दोन दिवस पाऊस थांबणार असल्याचा अंदाज दिला होता. मात्र 9 ते 13 जून असा चार दिवस पावसाचा मुक्काम वाढला आहे.
असा पडेल विभागवार पाऊस.. (कंसात जून मधील तारखा)
कोकणः (8,9,12,13)
मध्य व उत्तर महाराष्ट्रः (8 ते 13 )
मराठवाडा : (8 ते 11)
विदर्भः (8 ते 13 जून)
जिल्हावार यलो अलर्टः (कंसात तारखा)
रायगड (8), रत्नागिरी (8),अहिल्यानगर (8), पुणे (8), सातारा (8), सांगली (9), सोलापूर (8 ते 13 जून), छ.संभाजीनगर (8), जालना (8), बीड (8,10), हिंगोली (8), नांदेड (8,9), लातूर (9,12), धाराशिव (9 ते 11), अकोला (8 ते 10), अमरवती (8 ते 10),बुलडाणा (7 ते 9), गडचिरोली (7 ते 9), वर्धा (7 ते 9), वर्धा (7 ते 9),वाशिम (8,10), यवतमाळ (8 ते 10)
