Vishal Borkar Journalist
दै. अधिकारनामा & View Point News
गडचिरोली/चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदी परिसरातील बहुतांश शेतकरी दरवर्षी उन्हाळी धानपिकाची लागवड करीत असतात.मात्र या वर्षी उन्हाळी मका व धानपिकांचे हिरवंगार स्वप्न वादळ.अवकाळी पावसासोबतच पडलेल्या गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे. गारपिटीने जमीनदोस्त झालेलं धानपिक आता कापता येण्याजोगं राहिलेलं नाही. त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांच्या कापणीवर खर्च करायचा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी दिलखुश बोदलकर व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात निघावे यासाठी मोठ्या आशेने उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. मात्र तालुक्यातील लखमापूर बोरी परिसरातील मोठ्या प्रमाणात गारपीट तसेच वादळी पावसाने हजेरी लावली. परिणामी कित्येक शेतातील उन्हाळी धान पीक मातीमोल झाले.अनेक शेतीचे पंचनामे झाले असले तरी शेतकरी चिंतेत आहेत.त्या क्षेत्राचे कृषी सहाय्यक एस.बी. निमगडे मॅडम तलाठी श्री.शहारे सर कोतवाल श्री.जवादे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली.
