Vishal Borkar (Journalist)
दै.अधिकारनामा & View Point News
दर्जा मिळाला मराठीला अभिजात भाषेचा. भारत सरकार ने भारतात अन्य भाषेच्या सोबत आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा घोषित केला. अभिजात भाषा दर्जा हा जुनी प्राचीन बोली भाषा यांना मिळतो तोच भाषा दर्जा मराठीला मिळाला.मराठी अजून समृद्ध होण्यासाठी मराठी भाषेतील ग्रंन्थ सामुग्री मध्ये अजून वाढ व्हावी भाषा अजून समृद्ध व्हावी या साठी हा दर्जा देऊन भाषेचा गौरव केला जातो. हा भाव सरकारला अभिप्रेत आहे. मराठी भाषेतील आज पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झालेत. या पुढे निर्माण होण्यासाठी लेखक, कवी, साहित्यिक, कलावन्त, संत कीर्तनकार, व्याख्याते ई.यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार फक्त घोषणा करते. अंगीकार प्रचार प्रसार हा लोकांनी करायचा असतो. जनतेचे आपल्या भाषेची बोली अन ग्रंथ सामुग्री मध्ये वाढ व्हावी त्या साठी. लेखक कवी साहित्यिक यांना योग्य मान सन्मान प्रोसाहन देऊन त्यांच्याकडून भाषा समृद्ध करण्या साठी अधिक अधिक वाचनीय शास्रशुद्ध अचूक लिखाण कसं होईल त्या विषयी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लिहणारे खुप आहेत पण कामाचा व्यापात लिहणं राहुन जातं. कामं करतं असतांना वेळ मिळाला की लिखाण होतं असतं लेखक करतं असतो. शासनाने ज्यां साहित्यिक लोकांना लिहण्यात वेळ घालवायचा आहे अश्या लोकांना. लिहण्या साठी वेळ मिळावा म्हणून काम कमी करून त्यास छपाई लिहून प्रसिद्धी साठी ज्यास्तीत जास्त अनुदान देऊन समृद्ध साहित्य पुस्तकं ग्रंथ निर्मिती साठी योग्य वातावरण प्रोसाहन दिलं तर उच्च दर्जाचे साहित्य मराठी भाषेत खुप निर्माण होऊ शकते.असं माझं मत आहे. सरकार अनुदान प्रोसाहन पण देतं असते पण त्यातील जाचक अटी शर्थी खुप असतात. तसं न करता कमीत कमी अटीशर्थी ठेवून साहित्य प्रसिद्धी अनुदान दिलं गेलं पाहिजे. त्याने साहित्य विपुल होईल. दर्जा तपासून घेतला पाहिजे मात्र. ग्रामीण किंवा नवलेखक यांना नवीन साहित्य निर्मिती साठी प्रोसाहन दिले गेले पाहिजे. वृद्ध साहित्यिक यांना अनुदान मिळते पण त्यात सरकारने भरीव स्वरूपाची वाढ केली पाहिजे असं वाटतं. लेखक लिहून प्रसिद्ध करे पर्यंत त्याचा साहित्य प्रवास सुखर व्हावा म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. प्रचलित अनुदान मानधन यात केंद्र आणि राज्य सरकार यांनी वाढ केली पाहिजे असं वाटतं. साहित्यिक यांच्याकडून दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं की साहित्य दर्जेदार होईल आणि होतं असतं.सरकार अनुदान, मानधन, पुरस्कार देतं असते पण त्याची माहिती खुप कमी साहित्यिक यांच्यापर्यत पोहचते. सामाजिक न्याय विभागाने. सरकारी योजना साहित्य विषयी माहिती जास्तीतजास्त लेखक, साहित्यिक यांच्या पर्यंत कशी पोहचेल हा विचार केला पाहिजे. खाजगी सहकारी तत्वावर चालणारी मराठी साहित्य मंडळ खुप आहेत. त्यांच्या माध्यमातून योग्य कार्यक्रम साहित्य निर्मिती यांची योग्य प्रसिद्धी झाली पाहिजे.असो लिहण्या सारखं खुप आहे. भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व पर्याय अवलंबून सर्वांनी मिळून प्रचार प्रसार करून साहित्य निर्मिती कडे लक्ष दिले की दर्जा टिकवण्यात आपण यशस्वी होऊ.
दर्जा मिळाला अभिजात
भाषा आहे समृद्ध
करू साहित्यात वाढ
प्रयत्न करु अबालवृद्ध.©️®️
