Vishal Borkar (Journalist)
View Point News
नागभीड:- यावर्षी पावसाचे प्रमाण खुप असल्यामुळे खरीफातील शेती उत्पन्न जास्त होईल अस सर्व शेतकरी बांधवांना वाटत होतं पण नेहमी प्रमाणे या वेळेस सुद्धा ते निसर्गाला सुद्धा मान्य नव्हत अस दिसून आल . भारत हा कृषीप्रधान देश असून संपूर्ण भारतावर राज करणारा संपूर्ण जगाला पोसणारा हा शेतकरी राजा हा मात्र निराश हताश बसुन आहे . तोंडावर आलेले पिक हे कधी वातावरणामुळे तर कधी अती पावसामुळे तर कधी रोग राई मुळे हातातून गेल .
शेतकऱ्यांना त्याचा सामना करावा लागत असतो. यावर्षी अतीपासामुळे घोडाझरी तलावांमध्ये पाणि हा शिल्लक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग ने शेतकऱ्यांचे दुःख समजून या वर्षी उन्हाळी फसल देण्याचा निर्णय घेतला पण पुर्ण शेतकऱ्यांच याचा फायदा होणे शक्य नाही त्यामुळे पाटबंधारे विभाग ने घेतलेला निर्णयाला काही शेतकरी विरोध करत आहेत . घोडाझरी मायन्यर ५५ पर्यंत तरी आम्हाला पाणि दया अशी मागणी येनोली युवा भाजपा कार्यकर्ता र्श्री. विपुल गेडाम यांची मागणी आहे. अश्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नको अशी मागणी ते करत आहेत.
घोडाझरी सिंचन क्षेत्रातील शेतकरी बांधवांवर अन्याय.
घोडाझरी तलाव सध्या पाणीसाठा मुबलक असल्याने येनोली( माल) येथील ५५ व्या मायनर पर्यंत उन्हाळी फसल व्हायला पाहिजे ? मात्र जास्त प्रमाणात पाणीसाठा असूनही यावर्षी सोनापुर पर्यंत पाणी सोडण्याच निर्णय घेण्यात आला . त्यामुळे हा शेतकरयांवर अन्याय होत आहे.
श्री. विपुल गेडाम युवा कार्यकर्ते ( भाजपा)
