Vishal Borkar (Journalist)
View Point News
नागभीड
तळोधी: घरकुल लाभार्थ्यांचे दयनीय अवस्था आज महागाईच्या काळात शासनाकडून घरकुलाला मिळत असलेली रक्कम ही अपुरी पडत आहे.आज विटी चे भाव सिमेंटचे भाव व इतर सर्व गोष्टीचे भाव गगनाला भिडले असून शासनाकडून मिळणाऱ्या लाभांमध्ये घरकुल होत नसल्याच्या चर्चा सुरु आहे.आणि त्यासोबतच मिस्तरीची मजुरी या सर्व बाबींचा विचार करता आज रोजी मिळत असलेल्या रकमेमध्ये घरकुल होत नसल्याची चर्चा घरकुल लाभार्थ्यांकडून केल्या जात आहे. त्यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना किमान अडीच लाख रुपये ग्रामीण भागात घरकुलासाठी देण्यात यावे अशी मागणी घरकुल लाभार्थ्याकडून केल्या जात आहे.आणि ते वाजवी पण वाटते आज प्रत्येक गोष्टीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून मिळत असलेल्या रकमेमध्ये घरकुल बांधणे शक्य नसल्याचे घरकुल लाभार्थ्याकडून बोलल्या जात आहे.शासनाकडून मिळत असलेल्या रकमेव्यतिरिक्त घरकुलासाठी काहींना तडजोड करावी लागते तर काहींना कर्ज स्वरूपात रक्कम घ्यावी लागत असल्याचे सर्वसामान्य लाभार्थ्याकडून चर्चेला उधाण आहे.तरीही लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी साहेब यांनी या बाबीकडे जातीने लक्ष घालून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाच्या रकमेत वाढ करून देण्यात यावी अशी मागणी घरकुल लाभार्थ्याकडून केल्या जात आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना निकष सुद्धा दिलेले असले तरी निकषानुसार घरकुलांचा वाटप होत नसल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात असून योग्य लाभार्थ्यांना लाभ होत नसल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे. ज्यांच्याकडे आज रोजी बांधलेली घर आहेत अशा लोकांना सुद्धा प्रथम प्राधान्य दिले जात असून ज्यांच्याकडे टीनाचे व तट्ट्याचे घर आहेत अशा लोकांना मात्र घरकुलापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तरी वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष घालून पाहणी करून योग्य त्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकां कडुण केली जात आहे.
