Vishal Borkar (Journalist)
दै. अधिकारनामा & View Point News
तालुका प्रतिनिधी नागभीड
चंद्रपूर:-
ब्रह्मपुरीतील विदर्भ काॅलनीमधील बंटी बबलीने दोन व्यक्तींना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आणि एकाला पेट्रोल पंपची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून ब्रह्मपुरीतील कथित ‘बंटी-बबली’ने ६५.१४ लाख रुपयांचा गंडा घातला. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर या तिघांनीही या जोडीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र हे जोडपे ब्रह्मपुरीतून पसार झाले आहे. रोशनी नाकतोडे (२९) आणि रोमल नाकतोडे (३७, दोघेही विदर्भ कॉलनी, मालडोंगरी रोड,ब्रह्मपुरी, जि चंद्रपूर अशी या आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. १ एप्रिल २०२२ ते ४ एप्रिल २०२४ या कालावधीत रोशनी आणि रोमल यांनी लाखांदुरातील वॉर्ड क्रमांक ११ मधील शिवनगरी लेआउट येथे राहणारे रुपेश गावतुरे (४६) यांना पेट्रोल पंपची डीलरशिप देतो, असे सांगून ५३ लाख २८ हजार ८३७ रुपयांचा गंडा घातला. रूपेश यांचा मेहुणा नितेश गुरनुले हा देखील या दाम्पत्याच्या संपर्कात आला. त्यालाही सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली थाप मारून त्याच्याकडूनही ५३ हजार २८९ रुपये घेतले. एवढेच नाही तर, समीर ब्राह्मणकर यालाही ग्रामसेवकाची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने ११ लाख ३२ हजार रुपयांनी गंडा घातला. दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ना पेट्रोल पंप मिळाला; अथवा ना नितेश आणि समीरला नोकरी मिळाली नाही. एवढेच नाही तर, रक्कमही परत दिली नाही’बंटी-बबली’ चालाख जोडीएकाच शहरातील तिघांना लाखोंचा गंडा घालणारी ही बंटी-बबली जोडी चालाख आहे. आपले वरपर्यंत संबंध असल्याचे भासवून आणि गोड बोलून या पती-पत्नीने सलग दोन वर्षाच्या काळात पैसे उकळले. मात्र त्यांच्या चालाखीमुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षातच आले नाही. पोलिसांनी त्यांच्या पत्त्यावर जाऊन ब्रह्मपुरीत शोध घेतला, मात्र ते पसार झाले असल्याचे आढळले या तिघांनीही लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली. रूपेश गावतुरे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.
