वादळाने शेतातील सौर ऊर्जेचे पॅनल शेड उडाले
Vishal Borkar Journalist
दै.अधिकारनामा & View Point News
तालुका प्रतिनिधी नागभीड
चिमूर तालुक्यात दहा दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे चिचाळा (शास्त्री) येथील शेतकरी प्रशांत कैलास सुखदेवे यांच्या शेतातील विहिरीवरील अवघ्या चार महिन्यापूर्वी बसविलेले सौर ऊर्जेचे सोलर पॅनल शेड विहिरीपासून वीस फूट दूर उडाल्याने सोलर पॅनल शेड ठिकठिकाणी तुटल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या शेतकऱ्याने शेतामध्ये ओलीता साठी विहीर खोदून पिकाला पाणी देण्यासाठी त्यावर सौर ऊर्जेचे सोलर पॅनल बसविले होते. हा शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटार पंपाने शेतीचे ओलित करीत असून शेतकऱ्याच्या शेतामध्ये सध्या धान, सोयाबीन, कपास या पिकांची पेरणी केलेली आहे. या आठ दिवसात झालेल्या या पावसानंतर पावसाने उघडीप दिली असल्याने पाण्याअभावी पिके सुखण्याची स्थितीत आली असून शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे.या दहा दिवसापूर्वी झालेल्या वादळाने परिसरात मोठे नुकसान झाले असून ऐन खरिपाच्या हंगामात या शेतकऱ्याचे सौर ऊर्जेचे सोलर पॅनल उडाले याची तक्रार शेतकऱ्याने महावितरण तसेच सौर ऊर्जेचे पॅनल सेड बसविलेल्या सायरस पॅनल कंपनीला दिली असून सौर ऊर्जेचे शेड पूर्ववत करण्यासाठी कंपनीकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे त्वरित सौर ऊर्जेचे पॅनल शेड बसवून मोटार पंप सुरू करून देण्याची मागणी चिचाळा शास्त्री येथील शेतकरी प्रशांत कैलास सुखदेवे यांनी केली आहे.
