Vishal Borkar (Journalist )
View Point News
भद्रावतीत तालुक्याच्या हद्दीत गुन्हे शोध शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार कडून माहीती मिळाली की मौजा मांगली नाल्यातून भद्रावती शहराकडे एक महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टरसह अवैधरित्या रेती गौण खनिज भरलेले वाहतूक करीत आहे.
यावेळेस तात्काळ दोन पंचासह घटनेच्या ठिकाणी नाकाबंदी केली असता, माहिती मिळाल्याचा आधारे लाल कलर असलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टरसह हायड्रॉलिक जाॅक असलेले लोखंडी ट्राली त्यात अवैध रेती वाहतूक करीत असता समजता पंचासमक्ष जप्त करून तपासात घेत ४ लाख ५००० हजार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले. या दरम्यान घटनेचा तपास करीत आरोपी भारत वसंता बोढेकर (वय२१ रा. मांगली) व (समीर बंडु चौधरी वय २२ रा. मांगली ट्रॅक्टर चालक) या दोघांविरुद्ध भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलिस सूत्रानुसार प्राप्त झाली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात PSI गजानन तुपकर, अनुप आष्टणकर, जगदिश झाडे, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, रोहित चिटगीरे, रोहित घाटोळे यांनी केली.
