Vishal Borkar (Journalist)
दै.अधिकारनामा & View Point News 🗞️
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सर्व घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी हे केंद्र शासनाचे धोरण असुन त्यानुसार राज्यातील बेघर, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वता:चे हक्काचे घर मिळावे असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरीता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती,व नवबौद्ध, घटकांकरीता रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती करीता,शबरी आवास योजना,व आदीम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती, करीता यशवंतराव मुक्त वसाहत योजना ईतर मागास वर्ग, प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादीचा समावेश आहे.केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण टप्पा २ – तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन – २०२४-२५ मध्ये प्राप्त उद्दीष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्यातुन घरकुल बांधकामासाठी रू.५०,००० /- एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे घरकुल बांधकाम लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या ५०,०००/ हजार रुपयांच्या रकमेतुन ३५०००/हजार रुपये हे घरकुल बांधकामासाठी तर उर्वरित १५०००/ हजार रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर १०००/ वॅट्स युनिट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करीता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील.असे शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे.जो लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील १५०००/हजार रुपये अनुदान मिळणार नाही.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे घरकुल बांधकाम लाभार्थ्यांमधुन समाधान व्यक्त करन्यात येत असुन आता घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधकामांचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
