Vishal Borkar (Journalist)
View Point News
तळोधी बा. बसस्थानकांची सापसफाई केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात केरकचरा पडलेला असतो. तसेच या ठिकाणी बसस्थानक असून ब्रम्हपुरी चंद्रपूर बसेस तसेच नागपूरकडे जाणाऱ्या बसेस रस्त्यावरच थांबत असल्याने प्रवासी जनतेला बसची वाट पाहत रस्त्यावर थांबावे लागते आहे. या बसस्थानकाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात व्यवसायधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. तसेच बसस्थानकाच्या शौचालय व मूत्रीघराची कधीच सफाई केली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी प्रवासी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्यामुळे प्रवाशांना आजूबाजूच्या हाँटेलमध्ये जाऊन तहान भागवावी लागते. त्यामुळे संबंधित परिवहन विभागाने बसस्थानकावर असलेल्या समस्यांचे निराकरण करावे, अशी जनतेची मागणी आहे
