Vishal Borkar (Journalist)
View Point News
चंद्रपूर:
तळोधी शहरात घाणीचे साम्राज्य माणुसकीला आणि आरोग्य व्यवस्थेला प्रश्न विचारत आहे. की देशात या एच.एम.पी.व्ही. विषाणूच्या आगमन झाले आहे तरी ही कागदोपत्री अलर्ट होण्यापेक्षा जमिनीवर काम करणं महत्त्वाचं आहे. ही घाण केवळ परिसराची नाही,तर व्यवस्थेच्या दुर्लक्षाची आहे. आरोग्यासाठी स्वच्छता हवी, केवळ वचने नाहीत कामे हवी शहरात कचर्याचे उकिरडे साचले आहे. तरीहि पण कचर्याची गाड़ी येत नाही. घाणिच्या विळख्यात नागरिकांचा श्वास गूदमरला आहे. तरिहि ग्रामपंचायत प्रशासनातिल कर्मचारी झोपा काढत आहेत. कचर्याची गाड़ी गेल्या अनेक दिवसांपासुन बंद आसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरामध्ये जागो जागी कचर्यांचे ढिग जमा झाले. तरिहि ग्रामपंचायत कर्मचारी यांना काही फरक पडतांना दिसुन येत नाही. शहरातिल नागरिकांना शेकडो समस्या सहन केल्याशिवाय पर्याय राहिले नाही. शहरातील मगील काहि दिवसापासुन ग्रामपंचायतची कचर्यांची गाडी बंद आहे. त्यामुळे “कुणी कचरा नेता का कचरा”अशी हाक देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
जनतेने निवडुन दिलेले सरपंच, सदस्य गप्प का.
तळोधी शहरामध्ये प्रत्येक प्रभागात कचर्याचे ढिगारे पडलेले आहे. या कचर्याच्या ढिगार्यामुळे डास व दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे तळोधी शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. परंतु जनतेने निवडुन दिलेले सरपंच, सदस्य गप्प आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभिर विषयांवर लक्ष देण्याची मागणी नागरीकांकडुण केली जात आहे.
