Vishal Borkar (Journalist)
View Point News
चिमूर :-
चिमूर तालुक्यामध्ये कुठलेही उद्योग नसल्याने येथील 90 टक्के जनता ही शेतीवर अवलंबून असते, चिमूर तालुक्यात धान उत्पादनाला प्रथम प्राधान्य देण्यात येते व त्यानंतर कपास, तूर चना, गहू ही दुय्यम पिके घेतली जातात.चिमूर तालुक्यातील शेतकरी धान ( तांदूळ) पिकानंतर कडधान्य पीक घेत असतो.वातावरणात झालेल्या बदलामुळे कपास या पिकावर रोगाचे सावट निर्माण झाले ज्या प्रमाणात कपासाचे उत्पादन होणार होते त्यापेक्षा कितीतरी पटीने कपास शेतकऱ्यांना कमी होणार आहे, त्यामुळे त्याचा फटका कपास उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कपास उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला फटका इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसू नये, त्यामुळे कृषी विभागातर्फे सलग पीक प्रत्यक्ष पाहणी केली गेली व तूर,चना, जवस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पिकावर येणारे रोग व त्यावर करायचा उपाय योजना या संदर्भात नवतळा येथील कृषी सहाय्यक जी. एस. उमाटे यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकांचे निरीक्षण करण्यात आले, यावेळी त्यांना कृषी सहाय्यक बी.बी.आडे, पी.जी पवार ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार उपक्षम रामटेके व इतर शेतकऱ्यांच्या सहकार्य लाभले.
