Vishal Borkar (Journalist)
View Point News
पुणे : मातृ संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असलेला भारतीय मजदूर संघ 70 वर्ष पूर्ण करत आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी आपले जीवन कामगार हितार्थ समर्पित केले कायम,कंत्राटी,संघटित,असंघटीत कामगारांचे नेतृत्व करत शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रहित उद्योगहित कामगार हित या त्रिसूत्रीवर काम करत त्याग तपस्या आणि बलिदान देणारे अनेक कार्यकर्ते संघाने घडवले. आज दोन कोटी पेक्षा सदस्य संख्या असलेले देशातील मजबूत व बलाढ्य असे हे संघटन आहे. भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने 1 ते 20 डिसेंबर 2024 श्रमिक संपर्क अभियान आयोजित केले आहे. तळागाळातील शोषित पीडित वंचित कामगारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहे अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली. मागील सरकार काळात संघटनेने सतत संघर्ष करला या मुळे तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% पगार वाढ, पगारवाढीचा फरक, भरतीमध्ये वयात सवलत, जादा 10 गुण, अपघाती मृत्यू पश्चात वारसाला 4 लाख आर्थिक निधी, 5 लाख रुपयांचे विमा कवच, राष्ट्रीयकृत बँक वेतन खाते, आय टी आय करण्यास मुदत वाढ असे अनेक लाभ 42000 कंत्राटी कामगारांना मिळवून दिल्याने कामगार वर्ग खुश झाला. हे लाभ मिळण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, मा.चंद्रशेखर बावनकुळे, वीज कंपनी प्रशासनाचे संघटनेला विशेष सहकार्य लाभले. नवीन सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संघटनेने पारित केला. नवीन सरकार मधील ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात देखील नक्कीच सहकार्य करून प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केला.
