Vishal Borkar (Journalist)
View Point News
दि. १ डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक संविधानाची तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर सरकारच्या कोंबींग ऑपरेशनमुळे आंबेडकरी जनतेविरोधात गुन्हे दाखल करून अमानुष मारहाण करण्यात आली. व या प्रकरणातील एका भीमसैनिकाची पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत हत्या झाली असून या सर्व घटनेचा आणि प्रकरणाचा मास्टर माईंड कोण असा सवाल आंबेडकरी समाज करत आहे.तसेच दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे.
महाराष्ट्र बहुजन समाजातील महापुरुषांच्या विटंबना होने काही नवीन घटना नाही या घटना वारंवार का घडतात आणि कोण घडवून आणतात हा मोठा प्रश्न आहे. दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले देशभरातील आंबेडकरी जनता अभिवादन करून घरी पोहोचली नाही तोच परभणी शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची तोडफोड करण्यात आली. या विरोधात संविधान प्रेमी लोकांनी आणि आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलने केली. परभणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी घडलेल्या घटनेत बेजबाबदारपणा दाखवत पकडलेल्या आरोपीस माथेफिरू किंवा वेडा असल्याचे सांगितले. आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी माथेफिरू किंवा वेडा असल्याचे मत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने व्यक्त केल्याने परभणी शहरातील भीम सैनिक रस्त्यावर उतरले आणि रस्ता रोको करत आंदोलने सुरू केली याचवेळी परभणी शहरातील काही जातीवादी लोकांनी या भीम सैनिकांच्या अंगावर दगडफेक केली. आणि प्रकरण वाढत गेले. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी न करता परभणी शहरातील आंबेडकरी जनतेच्या घरांवर कोंबींग ऑपरेशन करून महिला पुरुष यांच्यावर घरात घुसून अमानुष मारहाण करत जेरबंद केले. कोंबींग ऑपरेशन केव्हा करावे लागते याचे भान जातीवादी सरकार आणि परभणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन विसरले आहे. असे चित्र पोलिस प्रशासनाच्या कारवाईतून दिसते. कोणत्या घटनेत घटनेत कोंबींग ऑपरेशन करावे याची माहिती पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती नसेल तर त्यांना निलंबित केलेले बरे परभणी जातीयवादी सरकार , परभणी शहरातील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून आंबेडकरी जनतेच्या बाबतीत नेहमीच आक्रमक भूमिका घेतात त्यांच्या या हलगर्जीपणामुळे परभणी शहरातील छत्रपती शिवाजी लॉ महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून या प्रकरणातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील जनतेतून येत आहे. दरम्यान याप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांनी या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करत प्रकरणातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे.
