Vishal Borkar (Journalist)
View Point News
सध्या महाराष्ट्रात बहु चर्चित असलेले माळशिरस तालुक्यातील मरकड गावात तीन तारखेला फेर मतदान होण्यासाठी तणाव पूर्ण वातावरण निर्माण झाले असून माळशिरस विधानसभेचे नूतन आमदार उत्तमराव जानकर व ग्रामस्थ यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे पहावयास मिळत आहे. पत्रकारांची बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की पोलीस प्रशासनाने गोळ्या जरी घातल्या तरीसुद्धा मतदान होणारच असा पवित्रा घेतला आहे. ईव्हीएम मशीनने या मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून मतदान चाचणीच्या माध्यमातून त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशीभूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.त्याचबरोबर माजी आमदार आर.जी रुपनवर बोलताना म्हणाले शासनाने व निवडणूक योगाने लोकांना नोटीसा देऊन दबाव टाकण्यापेक्षा मारकडवाडीतील गावाकऱ्यांची त्यामागची भावना काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे म्हणाले मारकडवाडी येथील लोकांची भूमिका ही लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातूनच पाऊल आहे.त्यामुळे मतपत्रिकेवरती मतदान व्हायला काय हरकत नाही.तसेच गावकऱ्यांनी सुद्धा काहीही झालं तरी मतदान करणारच अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे. मरकड वाडीत सध्या तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त व फौज फाटा तैनात केला आहे.
