Vishal Borkar (Journalist )
चंद्रपूर:-
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा कोरा करू असे, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. नागपूर अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कुठलाच मुद्दा उपस्थित केला गेला नव्हता. आता शेतकऱ्यांचा सातबारा कधी होणार कोरा, कर्जमाफीच्या आश्वासनाची कधी अमलबजावणी करणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत असून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारकडून लोकांना अपेक्षा आहेत. हे सरकार आमचा सातबारा कोरा करू शकते, असा विश्वास लोकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच आमचा सातबारा कधी होणार कोरा असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. एकदा तरी शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, अशी कर्जमाफीच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष आग्रही मागणी शेतकरी करीत आहेत.२०१७ मध्ये सुद्धा तत्कालीन युती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेत दीड लाख रुपयापर्यंतचे सर्व कर्ज माफ करणे, ५० हजार रुपये प्रोत्साहन दीड लाखावरील कर्जात सवलत, अशा प्रकारचा या योजनेत समावेश होता. परंतु त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह युती सरकारचे आश्वासन हवेतच विरले आहे. शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे त्यावेळी दिसून आले. २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधीलसुद्धा अनेक शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यानंतर २०१९ मध्ये सरकार बदलले आणि कर्जमाफीचे पोर्टल बंद झाले. तेव्हापासून लाखो शेतकरी या योजनेच्या लाभांपासून वंचित असून याबाबत अनेक शेतकऱ्यांनी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नसून कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असून आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी करीत
