Vishal Borkar (Journalist)
View Point News
४ डिसेंबर 2024 तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे जमीन हादरल्याने झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पडले कंपन कशाचे होते हे सकाळी स्पष्ट झाले नसल्याची माहिती होती विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यातील भिवापूर व काही गावात तर गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी आज सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान भूकंपाचे झटके जाणवले आहेत या भूकंपाची दरम्यान घरामध्ये भांडे हादरले व पलंग हालने गोदरेज अल्मारी हल्ल्याची माहिती मिळाली असून भूकंपामुळे कोणतीही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही सकाळी साडेसात वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
