या संदर्भात माहूर पोलिसात तक्रार दाखल
उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी-
माहूर/किनवट
Vishal Borkar (Journalist)
View Point News
श्रीक्षेत्र माहूरगड येथील पैंगनगा नदी पत्रात वृतसंकलन करण्यासाठी गेलेल्या राजु दराडे या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल
मा.ना.श्री मुख्यमंत्री साहेब यांना उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय किनवट मार्फत निवेदन दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले, माहूर येथील पत्रकार व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजु दराडे यांना एका रेती चोरट्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. नांदेड जिल्ह्यातील माहूर हे रेती चोरट्यांचे केंद्रच बनले आहे.संपूर्ण माहूर तालुक्यामध्ये लांजी,चोलेवाडी, नेर, टाकळी, पडसा, गोकुळ, हडसनी, हिंगणी, दिगडी, कुपटी, साकुर या सर्व ठिकाणी पैंगनगा नदी पात्रात अवैध रेती उत्खनन खूप मोठया प्रमाणात होते आणि हे सर्व माहूर येथील महसूल प्रशासन व तहसीलदारांना हाताशी धरून हे रेती चोर उत्खनन करतात.
मागे काही दिवसापूर्वी माहूर तालुक्याला लागूनच विदर्भात रेती चोरट्याकडून गोळीबार करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक रेती चोरट्यावर भरपूर असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिवस रात्र तालुक्यात रेती चोरट्यानी धुमाकूळ माजवला आहे. राजु दराडे या पत्रकारास धमकी देणाऱ्या प्रविण चोले या चोरट्यावर माहूर पोलीस स्टेशन येथे दि. 24 जानेवारी रोजी भा. द. वि. 351(4) दाखल करण्यात आला, त्याच्यावर याआधी भा. द. वि. 352,420,379 असे गुन्हे दाखल आहेत. या रेती चोरट्यानी संपूर्ण तालुक्यात दहशत पसरवली आहे. रात्रभर माहूर शहरात रेतीने भरून असलेले टिप्पर शहरात फिरतात याचे पुरावे शहरालगत असलेल्या वेगवेगळ्या दुकानाच्या सि सि. टीव्ही कॅमेऱ्यामध्ये मिळेल. अश्या रेती चोरट्याकडून पत्रकारांस धमकी देणे ही गंभीर बाब आहे. याच्या निषेध युवा ग्रामीण पत्रकार संघटने कडून संपूर्ण देशभरात केला जाईल. याहीआधी माहूर महसूल प्रशासनाला झोपेतून जाग येण्यासाठी वारंवार युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत कळविल्यानंतरच रेती साठे जप्त करतात हे अत्यंत गंभीर बाब आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीची गंभीर दखल घेऊन माहूर येथील तहसीलदारांची बदली करून या रेती तस्करांवर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. माहूर तालुक्यातील परिस्थिती पाहता माहूरचे तहसीलदार रेती तस्करी करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करणे तर सोडा पण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. अशामुळे रेती तस्करी करणारे जणूकाही आपणच मालक असल्याचे घाटावर पत्रकारांना सुद्धा न जुमानता त्यांच्यावर शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, कायदा हातात घेणे हे संविधानावर गदा आणण्यासारखी गोष्ट घडत असल्यामुळे संपूर्ण रेती घाट हे माहूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला घरकुलधारकांसाठी मिळेल का?हाच प्रश्न उभा होतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गंभीर प्रकरणावर एक विशेष समिती नेमून कुणालाही जीवित हानी होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व भविष्यात रेती घाटाचा लिलाव झाल्यावर ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून लक्ष असावे जेणेकरून अवैध रेती विकणाऱ्यांवर आळा बसेल. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर किनवट तर्फे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन देऊन प्रतिलिपी म्हणून:-
१.)मा. महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य.
२.) मा. पालकमंत्री साहेब नांदेड.
३.) मा. मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य.
४.) मा. विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर,
५.) मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड.
६.) माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड.
यांना सादर करण्यात आले.
